शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पराभूत झाले होते. मात्र त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवलीये. रविवारी शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालो. मात्र मला पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करेन,असं आठवले म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. तसेच राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती असून खासदार लोखंडे युतीकडून विद्यमान खासदार आहे. रामदास आठवलेंच्या वक्तव्याने आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र आठवलेंच्या इच्छेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा आहे.






