लग्न आमच्याशी ठरलं आणि ते पळून गेले दुसऱ्यासोबत… रावसाहेब दानवे शिवसेनेवर बरसले

0
392

जालना: यांचं लग्न आमच्याशी ठरलं आणि हे पळून गेले दुसऱ्यासोबत. यांनी आमच्यासोबत दगाफटका केला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेचा कोथळा बाहेर काढू असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. जालन्यातील राजूरमध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅडच्या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. राज्यातल्या बारा कोटी जनतेला बुरे दिन आणून या मुख्यमंत्र्याला तर अच्छे दिन आले असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांवर सर्व आमदार, खासदार नाराज आहेत असंही ते म्हणाले.