काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फुटण्याच्या तयारीत…

0
356
nabhik samaj protest against danve

भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे गटातील अंतर्गत नाराजीबाबतच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आमदार पळतील, असे ते म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचं मोठं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं. आम्ही कोणताही राजकीय पक्ष फोडणार नाही असं आम्ही म्हणत आलोत. मात्र अंतर्गत लाथाळीमुळं सरकार पडलं.

शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. हे सरकार आम्हाला टिकवायचं आहे. म्हणून आम्ही शिंदे गटातला एकही आमदार भाजपमध्ये घेणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.