मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही निवड केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला व त्यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. तत्पूर्वी संघटनपर्व पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना कार्यकारी अध्यक्षपद दिले गेले आहे.






