जिओफोन ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या जिओ स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये रु. ७५, रु. ९१, रु. १२५, रु १५२ आणि रु. १८६चे प्लॅन आहेत. होय, तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल आणि तुम्हाला या जिओ रिचार्ज पॅकबद्दल क्वचितच माहिती असेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस आणि डेटासोबत अनेक फायदे मिळतात.
रिलायन्स जिओ जिओफोन ग्राहकांसाठी ७५ रुपयांचा प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनची वैधता २३ दिवसांची आहे. तसेच ०.१ एमबी दैनिक इंटरनेट आणि एकूण २०० एमबी अतिरिक्त डेटा (२.५जीबी डेटा) मिळतो. याशिवाय, तुम्ही सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि ५० मोफत एसएमएस देखील घेऊ शकता.याशिवाय जिओ आपल्या ग्राहकांना नवीन परवणारे प्लॅन देत आहे. या जिओ प्लॅनची किंमत इतकी कमी आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही. येथे आम्ही जिओ फोन युजर्ससाठी उपलब्ध असलेले सर्व रिजार्च प्लॅनबाबत सांगणार आहोत.
जिओ ९१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा ९१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज ०.१ एमबी डेटा दिला जातो. याशिवाय, तुम्हाला २०० एमबी अतिरिक्त डेटा देखील दिला जातो. जिओच्या या प्लॅनमध्ये जिओफोन ग्राहकांना एकूण ३ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह मोफत ५० एसएमएसचा लाभ घेता येतो.
जिओ १२५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
या १२५ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २३ दिवसांच्या वैधतेसह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि०.५ एमबी डेटा दररोज दिला जातो. यासोबत तुम्ही मोफत ३०० एसएमएसचा लाभ घेऊ शकता.