जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी सरकारने माफी मागितली म्हणजे त्यांनी आपली चूक कबुली दिली आहे. सरकार एकीकडे माफी मागत आहे. मात्र संबंधित मंत्री अजूनही राजीनामा देत नसल्याने सरकार हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सरकारने अधिकाऱ्यांच्यामार्फत या घटनेची चौकशी करण्यापेक्षा या घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. जालना येथील लाठीमार घटनेवर सरकारने माफी मागितली. म्हणजे सरकारने चुकी केल्याचे मान्य केली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळाव्यात ते बोलत होते.