नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी रोहित पवार विरुद्ध खा.सुजय विखे पाटील! विखे म्हणाले.
प्रतिनिधी – विक्रम बनकर अहमदनगर
मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना खासदारकीच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार असल्याची चर्चा झाली या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुजय विखे पाटील यांनी मिश्किल टोला मारला असून मी त्याला विचारून घेईल मी चर्चा करून विश्वास ठेवणारा माणूस आहे. त्याला आधी विचारतो काय त्याच्या मनात आहे आणि त्या अनुषंगाने मग तयारीला लागतो तो हो म्हणाला तर जास्त तयारी करावी लागेल पण आम्ही चर्चा करून ठरवू सध्या राज्याची परिस्थिती कशी आहे हे सर्वजण पहात आहात मित्र वैरी वैरी मित्र असे सर्व एक समान झालेले आहेत त्यामुळे सर्वजण आपापल्या मित्राच्या शोधात आहेत नवीन मित्र शोधतात अशा मित्रांच्या सानिध्यात राहून नवीन राजकारण करता येत असेल तर करूयात असं त्यांनी सांगितलय
Home नगर जिल्हा नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी रोहित पवार विरुद्ध खा.सुजय विखे पाटील! विखे म्हणाले….व्हिडिओ