विधान परिषद निवडणुकीत आता कमालीची चुरस निर्माण झाली आहे. भाजपनं या निवडणुकीत चांगलीच रंगत आणलीय. सदाभाऊ खोत यांनी सहाव्या जागेसाठी भाजप समर्थित उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. भाजपमधील चर्चित नावांना मागे सारत सदाभाऊंनी अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊंच्या नावाची घोषणा सहावे उमेदवार म्हणून केली आहे. विधान परिषदेसाठी आता 10 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. यात महाविकास आघाडीकडून सहा तर भाजपकडून सहा उमेदवार आता रणांगणात आहेत.