लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीतील हॅाटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असे म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॅाटेलमालकाने १६ जून रोजी दुपारी पंचायत समितीच्या आवारात माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अडवले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोरच उधारीसाठी हॅाटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली.
दरम्यान खोत यांनी सदर उधारीच्या विषयाचा इन्कार करीत हॉटेल मालकाला आपण ओळखत नसल्याचे स्पष्ट केले.






