सागर कलगुंडे यांची डाक विभागिय पॉवर लिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
188

डाकविभाग राज्यस्तरीय निवड स्पर्धा नाशिक येथे संपन्न
जयपूर राजस्थान येथे संपन्न होणार राष्ट्रीय स्पर्धा

अहमदनगर: भारतीय डाक विभागाच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग,वेट लिफ्टिंग,बॉडी बिल्डर्स राज्यस्तरीय स्पर्धा दि 7 जुलै रोजी आयोजित केली होती.
या स्पर्धेत राज्यभरातील एकोणचाळीस स्पर्धकानी सहभाग घेतला.
या एक दिवसीय स्पर्धेतून दि 26जुलै ते 29 जुलै 2022 दरम्यान जयपूर, (राजस्थान)येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता राज्यभरातील सोळा स्पर्धकांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीयस्पर्धेसाठी पाच खेळाडूंची पॉवर लिफ्टिंगकरिता,पाच खेळाडूंची वेटलिफ्टिंगसाठी तर सहा खेळाडूंची बॉडीबिल्डिंगसाठी निवड झाली.
यामध्ये पॉवर लिफ्टिंगमध्ये अहमदनगर विभागातील
श्री सागर कलगुंडे तर मुंबई मधून श्री टी डी मुने,सिद्देश तारी, संतोष ठोंबरे संदिप नार,वेटलिफ्टिंग मध्ये श्री लखन वैष्णव औरंगाबाद ,मुंबईतील डी डी गव्हाणकर, संजय मयेकर संतोष गुंड जयंत प्रभू,किरण मूलमुळे, कोल्हापूर मधील अभिलाष पवार,सुनिल मुगदुम पुणे मधील वसीम शेख यांची राष्ट्रीय स्पर्धाकरिता निवड झाली.
या निवड चाचणीसाठी अहमदनगर विभागातील श्री संदिप कोकाटे, सागर कलगुंडे, तान्हाजी सूर्यवंशी,कमलेश मिरगणे यांनी सहभाग घेतला होता.
नाशिक येथील राज्यस्तरीय स्पर्धा श्री एम एस अहिरराव प्रवर अधिक्षक डाकघर नाशिक यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
श्री सागर कलगुंडे यांची जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धा करिता निवड झालेबदल त्याचे विशेष अभिनंदन पोस्टल संघटनेचे राज्यउपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी करत त्याना राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
श्री सागर कलगुंडे यांचे निवडीबदल त्याचे श्री रावसाहेब चौधरी,श्री नामदेव डेंगळे,प्रदिप सूर्यवंशी, प्रितम वराडे,सुनिल थोरात,आसिफ शेख ,भाऊसाहेब जाधव, नितीन खेडकर,श्रीकांत चौधरी, बाळराजे वाळूजकर,बापु तांबे,प्रकाश कदम, नितीन थोरवे,सुबोधकुमार,मिनीनाथ काळे,सागर पंचारिया,युवराज राऊत, अभिमनुकुमार,झुंबरराव विधाते,स्वाती पिंगळे,मोनाली हिंगे, वंदना नगरकर, निलिमा कुलकर्णी,वासंती नगरकर,अश्विनी चिंतामणी,आरती भालेराव,सविता ताकपेरे, अर्चना भुजबळ यांचे सह डाक सहकारी मित्रांनी अनेकांनी अभिनंदन केले.