लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार लांबणीवर? आदिती तटकरेंनी केलं मोठं विधान…

0
38

लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक चर्चा सध्या रंगत आहेत. ही योजना बंद पडणार असून लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांना फटका बसत असल्याचं बोललं जात आहे. यावर आता महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

या योजनेमुळे शिक्षकांचे पगार होत नाही आहेत, हे खरं आहे का? असा प्रश्न तटकरे यांना पुण्यात पत्रकारांनी विचारला असता त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, नागपूर बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेच्या निधीची तरतूद केली होती. 24 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे हफ्ते सुरू झाले आहेत. दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही. त्या त्या विभागाचे मंत्री निधी पाहात आहेत, असं सांगत शिक्षकांचे पगार रखडल्याची बातमी समोर आली होती, यावर बोलताना आदिती तटकरे यांनी म्हटलं की, शिक्षकांचा पगार होत नाही अशी चुकीची अफवा पसरवली जात आहे. त्यांचेही पगार वेळेत होतील. लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याही खात्यावर ताण आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.