महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झालेला असतानाच शिवसेनेने नवा डाव टाकला आहे. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर ठेवण्याचा प्रस्ताव राज्य मंत्री मंडळात मांडणार असल्याचं परीवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. खरंतर महाविकासआघाडी सरकार आल्यापासूनच भाजपने औरंगाबादचं संभाजीनगर कधी करणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सत्तेत असलेल्या काँग्रेसनेया नामांतराला विरोध केला होता.
शिवसेनेने आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव येणार असल्याचं सांगितल्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.