वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानची मुक्तता करण्यासाठी वानखेडेंनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितले होते, शेवटी 18 कोटींना डील पक्की झाली होती, असं सीबीआयनं आपल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. वानखेडेंच्या वतीनं किरण गोसावीनं 50 लाखांचं आगाऊ पेमेंटही घेतलं होतं, असाही आरोप सीबीआयनं केला आहे. एवढंच नाही तर महागडी गाडी आणि हाय-फाय ब्रँड्सच्या कपड्यांबद्दल वानखेडेंनी नीट माहिती दिली नाही, तसेच, परदेश दौऱ्याबद्दलही काही बाबी लपवून ठेवल्या असा सीबीआयला संशय आहे