Big Offer….Samsung च्या फोल्डेबल फोनवर तब्बल 25 हजारांची सूट!

0
12

सॅमसंगचा फोल्डेबल फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप 4 5G हे सॅमसंगचं लोकप्रिय फोल्डेबल मॉडेल सध्या फ्लिपकार्टवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. सध्या हा फोन लाँच किमतीपेक्षा फारच कमी किमतीत उपलब्ध आहे. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप 4 5G या फोनच्या बेस व्हॅरिएंटची लाँचिंग किंमत 89 हजार 999 रुपये आहे. बेस व्हॅरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह मिळतो; पण सध्या हा फोन फ्लिपकार्टवर फक्त 64 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच हा फोन मूळ किमतीपेक्षा 25 हजार रुपयांनी स्वस्त दरात मिळत आहे. याशिवाय, बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकता. ही ऑफर फोनच्या पिंक गोल्ड, बोरा पर्पल आणि ग्राफाइट या तिन्ही कलर व्हॅरिएंटवर मिळू शकते.