अशीही ग्रामपंचायत…दोन सख्खे साडु बनले सरपंच, उपसरपंच…

0
21

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील खेराडे-वांगी या गावी अनोखे चित्र आता पाहायला मिळाले आहे. याठिकाणी दोन्ही सख्खे साडू हे सरपंच आणि उपसरपंच बनले आहेत. इथल्या निकालाची सर्वत्र चर्चा होत आहे. सरपंचपदाच्या थेड निवडणुकीत साडू निवडून आल्यानंतर बुधवारी उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत दुसरे साडू निवडून आले. विशेष म्हणजे दोन्ही जणांचे नाव सारखेच आहे. दोघांचे नाव अनिल सूर्यवंशी असे आहे.