बाळासाहेब थोरातांचे संगमनेरात जोरदार स्वागत, सत्यजित तांबेही बरोबर… म्हणाले कॉंग्रेस विचारांशी तडजोड नाही….

0
30

नगर: कॉंग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात खांद्यावरील उपचारानंतर दीर्घ कालावधीनंतर प्रथमच संगमनेर येथे दाखल झाले. त्यांचे शहरात भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या समवेत आमदार सत्यजित तांबे हे सुद्धा होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की,
तब्बल दीड महिन्यानंतर आज संगमनेरमध्ये परतलो. जनतेचे प्रेम ही माझी खरी शक्ती आहे, त्याचा आज पुन्हा प्रत्यय आला.
खांद्याचे दुखणे अजूनही पूर्णतः बरे झालेले नाही, मात्र काळजी घेत मी मायबाप जनतेच्या दरबारात दाखल झालो आहे.
आपला विचार काँग्रेसचा आहे, त्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. माझ्या काही व्यथा असतील त्या मी पक्षाच्या व्यासपीठावर मांडलेल्या आहे. त्या आम्ही माध्यमांसमोर नाही, तर पक्षाच्या व्यासपीठावरच सोडवू.
संगमनेरसह राज्यातल्या विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे.