काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर ढकललं आहे…

0
36

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीदरम्यान सत्यजित तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघ प्रचंड चर्चेत होता. तांत्रिक अडचणींचे कारण देत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर सहा वर्षे निलंबनाची कारवाी केली. या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव करत सत्यजित तांबे यशस्वी ठरले. सत्यजित तांबे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.]

काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर ढकललं आहे”, असं सत्यजित तांबे म्हणाले. “काँग्रेसच्या बाहेर मला ढकललं असलं तरी माझ्या रक्तात आणि विचारांत काँग्रेस आहे. २०३० मध्ये काँग्रेसमध्ये माझ्या परिवाराला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, काही लोकांनी बाहेर ढकलून दिलं असेल तर ही पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की मला त्यांनी बोलावलं पाहिजे. परंतु, अशी कोणतीही हालचाल अद्याप झालेली नाही”, असं सत्यजित तांबे यांनी पुढे स्पष्ट केलं. दरम्यान, कोणत्या लोकांनी टार्गेट केलं, याबाबत त्यांचा कोणावर रोख आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

“माझे काँग्रेसच्या वरिष्ठांशी मतभेद झाले नाहीत. तसेच, कोणाशी मतभेद असण्याचं कारणही नाही. निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांबद्दल अनेक माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. तेव्हा काही ठराविक लोकांनी गैरसमज निर्माण केलं. त्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली”, असंही सत्यजित तांबे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.