मुख्याध्यापिकेला खुर्चीवरून हाकलून देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काय केलं…धक्कादायक व्हिडिओ

0
12

पेपर फुटीच्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून प्रयागराजमधील शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्यात आली. तिला कामावरून काढून टाकल्यानंतर कार्यालयातून जबरदस्तीने काढून टाकण्यात आले. या गोंधळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. शहरातील बिशप जॉन्सन गर्ल्स स्कूल अँड कॉलेजमध्ये ही घटना घडली असल्याचे समजतेय.

तपासात पारुल सोलोमन या शाळेच्या मुख्याध्यापिकेचे नावही समोर आले होते त्यानंतर आता तिला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पारुल यांच्या जागी शाळेने शर्ली मॅसी या नव्या मुख्याध्यापिकेची नियुक्ती सुद्धा केली होती मात्र त्यानंतरही पारुल आपली जागाच सोडायला तयार नव्हत्या. आपल्या खुर्चीवर अडून बसलेल्या मुख्याध्यपिकेला कार्यलयातून बाहेर काढताना झालेला गोंधळ सध्या ऑनलाईन पाहायला मिळत आहे.https://x.com/Dr_MonikaSingh_/status/1809527295356330293