२ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा भूकंप झाला. कारण हाच तो दिवस होता ज्यादिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह या दोहोंवर दावा सांगितला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत.
नागालँडच्या राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. सात आमदार त्यांचे पदाधिकारी हे सगळे अजित पवारांना पाठिंबा देणार हे नक्की झालं आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग यांनी दिल्लीत येऊन प्रफुल्ल पटेल यांची आणि महाराष्ट्रात येऊन सुनील तटकरेंची भेट घेतली. त्यानंतर या निर्णयाची माहिती देण्यात आली. शरद पवारांसमोर पक्ष बांधणीचं आव्हान आहे