लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या आणि त्यांचा एक रोड शो देखील झाला. त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना फायदाच झाला. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या जेवढ्या सभा होतील, तेवढा फायदा आम्हाला होईल, असा खोचक टोला शरद पवार यांनी मोदी यांना लगावला. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
राज्यात मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या, तिथं आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. विधानसभेला त्यांनी अजून सभा घेतल्या तर आमच्या फायद्याच्या ठरतील, असा खोचक टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. तर मतदारांनी मतांच्या माध्यमातून संदेश दिल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला. तसंच सोडून गेलेल्यांना परत घेणार नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. जे सोडून गेले त्यांना परत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं पवार म्हणाले. विधानसभेत पंतप्रधान मोदींच्या मोदींच्या जेवढ्या सभा होतील, तेवढं बहुमत मिळेल. म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. तर धार्मिक धृवीकरण झालं, पण त्याला यश मिळालं नसल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.