महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये कधीही लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल तोंडावर असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, या वक्तव्याची पुनरावृत्ती केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस 5 मे ला कोल्हापुरात सीमाभागात होते. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी करताच एकच खसखस पिकली. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी टोला लगावला. आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येईल, हे मी सांगू शकत नाही. देवेंद्र फडणवीस जर पुन्हा येईन म्हणतात तर त्यांना निकाल बाबत माहिती असेल, असा टोला शरद पवारांनी लगावला.