न थकणारा, न दमणारा, न थांबणारा लोकनेता…

0
32

न थकणारा, न दमणारा, न थांबणारा लोकनेता

शरद गोविंदराव पवार….गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ देश व राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेले हे नाव आहे. राजकारणापेक्षा समाजकारण अग्रस्थानी मानणारे, लोकांमध्ये रमणारे, त्यांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे पवार साहेब हे सच्चे लोकनेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला सामाजिक जाणिवांचे एक वलय लाभलेय. म्हणूनच की काय आज वयाच्या ८३ व्या वर्षीही तरूणांनाही लाजवेल अशा उत्साहाने, ऊर्जेने पवार साहेब विविध कार्यक्रमांना फिरत असतात, लोकांमध्ये वावरत असतात, त्यांच्या अडचणी समजून घेत असतात, निव्वळ इतकंच नाही तर त्या सोडवण्यासाठी कोणता मंत्री, कोणता अधिकारी, कोणत्या संस्थेशी बोलायला हवे याची अचूक माहिती त्यांना असते, आणि त्यामुळे तातडीने त्यांना संपर्क साधून काम तडीसही नेले जाते…

लोकांविषयी ही कळकळ, ही आस्था हाच पवार साहेबांचा उर्जास्रोत आहे. पवार साहेबांच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत याची प्रचिती ठायी ठायी येते. दमणे, थकणे, थांबणे या शब्दांशी पवार साहेबांची कधीही ओळख झाली नसावी बहुतेक.. म्हणूनच वय, संकटं, आजारपणं त्यांना कधीही रोखू शकलेली नाहीत. पवार साहेबांची जिद्द आणि कामाचा आवाका किती प्रचंड आहे हे त्यांच्या टाईमटेबलकडे पाहिले की सहज लक्षात येईल. गेल्या आठवड्यात गुरूवारपर्यंत पवार साहेब केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत होते. या काळातही त्यांच्या युवकांशी, पक्ष कार्यकारिणीतील विविध भेटीगाठी सुरू होत्या. शुक्रवारी ते नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ अधिवेशन, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अॅड. नितीन ठाकरे यांचा नागरी सत्कार, कादवा सहकारी साखर कारखान्यातील इथेनॉल आसवणी प्रकल्पाचे उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांना हजेरी लावली, त्यासाठी विविध स्थळांना भेट दिली. शनिवारी ते मुंबई देशस्थ मराठा ज्ञातिधर्म संस्थेच्या नवी मुंबई येथील नूतन सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. तर रविवारी वर्धा आणि नागपूर इथे पवार साहेबांनी दौरा केला. सकाळी आधी मुंबई ते नागपूर असा विमानप्रवास ते करतात, तिथून पुढे पवार साहेब वर्ध्यापर्यंत रस्त्याने प्रवास करतात, त्यानंतर सेवाग्राम इथे ग्रामसभा मेळाव्याला उपस्थित राहतात, नंतर वर्धा येथील संयुक्त व्यापारी समितीने आयोजित केलेल्या व्यापारी संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहून व्यापाऱ्यांना भेडसावणारे स्थानिक प्रश्न व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करतात, आणि त्यानंतर सर्कस ग्राऊंड इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, त्यांना नवी ऊर्जा देतात. हा भरगच्च दौरा वाचूनच आपल्याला थकवा येईल.. पण पवार साहेब थकत नाहीत… पुढे नागपूर ते मुंबई या विमानप्रवासात काहीशी उसंत घेतील तर तेही नाही.. दौऱ्यादरम्यान विविध व्यक्ती, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्याकडे काही निवेदने घेऊन आलेले असतात, आपल्या व्यथा मांडून गेले असतात. विमानप्रवासात ही निवेदने लक्षपूर्वक वाचून समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यावर कोणी कार्यवाही करायला हवी, याच्या नोट्स काढून, तात्काळ तशा सूचना दिल्या जातात…

पवार साहेबांची ही कार्यपद्धत फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. पक्षातील प्रत्येकासाठी त्यांची ही ऊर्जा मार्गदर्शक ठरतेच.. पण शरद गोविंदराव पवार या अथक व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव असलेली ही ऊर्जा युवावर्गासाठीही प्रेरणादायी आहे.

#योद्धा_83 #SharadPawar #लोकनेता

साभार: राष्ट्रवादी फेसबुक पेज