एवढी मोठी माणसं असं बेताल बोलतात तरी कसं?… भाजप नेत्याच्या वक्तव्यावर शिंदे गटाची प्रतिक्रिया

0
22

शिंदे गटाचे उपनेते आणि माजी खासदार अर्जुन खोतकर यांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्या विधानावर भूमिका मांडलीय. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत आश्चर्य व्यक्त केलंय.

“एवढी मोठी माणसं असं बेताल बोलतात तरी कसं? हे समजतच नाही. शिंदे सरकार संविधानाच्या चौकटीत राहून स्थापन झालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली.

“आपली लोकशाही संख्या बळावर अवलंबून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेत त्या संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार स्थापन केलल आहे”, अशी भूमिका अर्जुन खोतकर यांनी मांडली.
शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक सरकार असल्याचं स्पष्ट मत सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केल होतं.