शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, शिंदे गटाने थेट उद्धव ठाकरेंना सुनावले

0
668

एका दर्जेवर गेलेला मोठा नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी कधी शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत्त आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेबांना खुजे करू नका’ असं म्हणत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं.

शिंदे गटाने बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. या सगळ्या भूकंपानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून आपल्या रोखठोक बाजू मांडली. या मुलाखतीमुळे शिंदे गटामध्ये खळबळ उडाली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उद्धव ठाकरेंनाच उत्तर दिलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे आमच्यासाठी खूप मोठे आहे. त्यांच्या पुणाईमुळे आम्ही आमदार, खासदार झालो आहोत. तुम्हाला राजकारण करायचे आहे तर बाळासाहेबांचं वापर कशाला करता. एका दर्जेवर गेलेला मोठा नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी कधी शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत्त आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेबांना खुजे करू नका, असं शिरसाट म्हणाले.