भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज शिर्डीमध्ये येऊन सहकुटुंब साईबाबाचं दर्शन घेतलं. मी नेहमीच साईबाबांच्या दर्शनला येत असतो, महाराष्ट्राच्या विकासासाठी साईबाबांना प्रार्थना केली. पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्याची शक्ती बळीराजाला दे असं साकडं आपण साईबाबांना घातल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.
जो पक्ष विरोधी पक्षनेता ठरू शकत नाही, तो लोकसभेच्या 24 जागा कशा जिंकणार असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्याच्यामध्ये समन्वय आणि एकवाक्यता नाही. आमच्याशी लढताना ते विरोधी पक्षनेता ठरू शकत नाहीयेत. त्यांची हातबलता समोर आली आहे. विरोधी पक्षनेता निवडीच्या दिवशी काँग्रेसमध्ये मोठा स्फोट होणार आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावाही यावेळी दरेकर यांनी केला आहे.