सावेडी येथील बंधन लॉन महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महायुतीच्या नेत्यानी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखडे, खा.सुजय विखे, भाजपाचे प्रदेश आ राम शिंदे, राष्ट्रवादीचे आ संग्राम जगताप, भाजपाचे आ. बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, भाजपचे प्रदेश सदस्य प्रा.भानुदास बेरड, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, शिवसेनेचे नेते बाबुशेट टायरवाले, संपर्कप्रमुख सचिन जाधव, संपर्कप्रमुख अनिल शिंदे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, आरपीआयचे(आठवले गट) सुनील साळवे, यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनील साळवे म्हणाले की, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शिर्डी मधून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याची भावना त्यांनी यावेळी पालकमंत्री विखे यांच्यासमोर व्यक्त केले. त्यानंतर लगेच पालकमंत्री विखे यांनी हातात माईक घेत भाष्य केले. ते म्हणाले, हा मेळावा जिल्ह्यातील कार्यकर्ताचा आहे. या मेळाव्यातून महायुतीच्या योजनांची माहिती द्यावी असे सांगत या विषयाला बगल दिली.






