शिंदे गटातले १३ जणांपैकी एकही खासदार निवडून येणार नाही, भाजपाने २२ जागा देण्याचा प्रश्नच येत नाही

0
20

खासदार गजानन कीर्तिकर यांच्या या वक्तव्यावर राजकीय स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काल भाजपाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्यावर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खैरे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं की, केवळ १३ बंडखोर खासदार एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे भाजपाने शिंदे गटाला २२ जागा देण्याचा प्रश्नच येत नाही
माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, भाजपाने माहिती घेतली आहे त्याप्रमाणे यांच्यापैकी (शिंदे गटातले १३ खासदार) एकही जण निवडून येणार नाही. मग कशाला देतील ते इतक्या जागा. मुळात भारतीय जनता पार्टीने याबाबत एक सर्वेक्षण आधीच केलं आहे, ते प्रसिद्धही केलं आहे. त्यानुसार या १३ जणांपैकी एकही खासदार निवडून येणार नाही.
चंद्रकांत खैरे म्हणाले, मी स्पष्ट सांगतोय यांची (भाजपा – शिंदे गट) आपसात भांडणं सुरू झाली आहेत. गजाभाऊ कीर्तिकर यांनी सांगितलं की आमची कामं होत नाहीत ते खरंच आहे. आता त्यांना सजलंय की आपण चूक केली आहे. गजाभाऊ अगदी करेक्ट ट्रॅकवर आले आहेत. त्यांना माहितीय आता आपलं काही खरं नाही. आगामी लोकसभेला त्यांच्या मुलाला त्यांच्याविरोधात उभं केलं जाऊ शकतं, त्यामुळे ते चिंतेत आहेत