ठाकरे गटाला आणखी एक धक्का… विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद अडचणीत!

0
37

निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्यावर शिक्कामोर्तब केलं, यानंतर शिवसेना आमदारांनी विधिमंडळ कार्यालयावर आणि संसदेतल्या शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवला. यानंतर आता शिंदेंच्या टार्गेटवर ठाकरेंच्या पक्षाकडे असलेलं आणखी एक पद आहे.

विधानपरिषदेमध्ये ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे, पण या पदावरही ठाकरे गटाला पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अंबादास दानवे हे सत्तापक्षाचा भाग झाले आहेत, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर ठेवू नये, अशी भूमिका शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते. तसं झालं तर अंबादास दानवे यां