सोलापूर:सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून शिवसेने मार्फत जनतेची सेवा करणारे निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना किंवा कार्यकर्त्यांना आता मान सन्मान राहिला नाही. बार्शी तालुक्यात शिवसैनिकांना साधी इन्ट्री देखील नव्हती त्यावेळी शिवसेना वाढविण्यात मोठा प्रयत्न केला. तरीही पक्षातील पक्षश्रेष्ठी हे पक्ष प्रमुखांशी भेटू देखील देत नाहीत.
सद्यस्थितीत शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट अशी परिस्थिती झाली आहे, असा गंभीर आरोप करत भाऊसाहेब आंधळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे.






