दसरा मेळाव्याला परवानगी मिळताच उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शिवसैनिकांना म्हणाले…

0
1336

मुंबई: अखेर शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. कोर्टाने ही परवानगी दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुमचा हा उत्साह, प्रेम आणि एकजूट अशीच कायम ठेवा. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे. आपल्याला शिवरायांचा भगवा फडकवायचाच आहे. निवडून आल्यावर रुसवे फुगवे, होऊ देऊ नका. गटतट होऊ देऊ नका, असं सांगतानाच भगवा झेंडा हीच आपली उमेदवारी आहे. त्यासाठी कामाला लागा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. कोर्टाच्या निकालानंतर शिवसैनिकांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ते शिवसैनिकांना संबोधित करताना बोलत होते.