मंत्रालयात २ वॉररूम..उपमुख्यमंत्री हेच छुपे मुख्यमंत्री आहेत का? शिवसेनेचा सवाल

0
274

मंत्रालयात दोन वॉररूम स्थापन करण्यावरून शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्कूटर सरकार असून त्यांचं आपसातच युद्ध सुरू आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी करत ही टीका केला आहे.

मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांच्याही वेगवेगळ्या वॉररूम स्थापन करण्यात आल्या आहेत, यावरून या स्कूटर सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही, असं दिसत आहे, अशी टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.