शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानं खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आलीय. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं पडझड झालेला शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा बांधायला सुरुवात केलीय. ह्या नियुक्तींमुळं उद्धव ठाकरेंकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचं पहायला मिळत आहे.