मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्र सोडलं. “एकनाथ शिंदे हे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत. त्याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे,” असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी अरविंद सावंतांनी राधाकृष्ण विखे पाटलांची तुलना थेट सरड्याशी केली आहे. एकनाथ शिंदे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत, या विखे पाटलांच्या विधानाबद्दल विचारलं असता अरविंद सावंत म्हणाले, “राधाकृष्ण विखे-पाटील म्हणजे रोज रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत. आज या पक्षातून उद्या त्या पक्षात उड्या मारतात. शिवसेनेतही होते. कोणता पक्ष शिल्लक राहिल का विचारा?”






