केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राणेंच्या पीएला दम दिला होता, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला. ते मंगळवारी कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली.
विनायक राऊत यांनी म्हटले की, नारायण राणे यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे यांना दम भरला. आधी या सचिवाला काढून टाका अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल, असा थेट दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला.