नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा मूळ उमेदवार ऐनवेळी पलटल्याने मोठी राजकीय गुंतागुंत झाली. काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा देणार, यावरून आज सकाळपासून राजकीय खलबतं सुरू होती. नाशिक शिवसेनेचे पदाधिकारी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच इतर नेत्यांमध्ये आज सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरु होतं. आज अखेर ठाकरे गट अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.