ठाकरे गटाकडून पक्षाच्या नावासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय सादर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा समावेश आहे.
दरम्यान नावाप्रमाणेच उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हाच्या निवडीसाठी देखील तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहेत. त्यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन पर्यायांचा समावेश आहे. यापैकी एक चिन्ह मिळावे अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.






