अमित शहांच्या टिकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर….काल’मोगॅम्बो’ मला म्हणाला…

0
25

मोगॅम्बो काल म्हणाला की मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यात कोण कोणाचं काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये अमित शाह यांना उत्तर दिलं आहे. आता जे काही राज्यात सुरू आहे ती कुठली चाटुगिरी आहे? कोण कोणाचा कुठला भाग चाटतो आहे? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्याला आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

मी काँग्रेससोबत गेलो तेव्हा मी हिंदुत्व सोडलं म्हणाले. तुम्ही मेहबुबा मुफ्ती सोबत गेलात तेव्हा काय सोडलं होतं? की तेव्हा हिंदुत्वापासून टाइम प्लीज घेतली होतीत? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. प्रमोद महाजन यांना एकदा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की एक दिवस असं होईल की देशातले लोक हिंदू म्हणून मतदान करतील. आज हिंदू जागा झाला आहे. मात्र त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम सुरू आहे. निवडणूक आली की हिजाबचा मुद्दा काढायचा, गोहत्येचा मुद्दा काढायचा असे मुद्दे काढून हिंदूंच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.