Shri Swami Samarth
मौजे त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ व श्री. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची बेकायदेशीररित्या बदनामी करुन गुरुपीठात 50 कोटीचा अपहार केल्याचे आरोप केल्याने सेवेकरीच्या धार्मिक भावना दुखावल्याने संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी दक्षिण जिल्हा प्रतिनिधी प्रकाशरावजी खेमनर, विजय मगर, चंद्रशेखर लोळगे, शांताराम पवार आदीसह सेवेकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्री.स्वामी समर्थ सेवा परिवारातील सेवेकरी असून शेतीचा व व्यापारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. श्री.स्वामीसमर्थ मार्गाचे काम हे श्री.परमपूज्य मोरेदादा व त्यानंतर सर्व सेवेकर्यांचे आधारस्तंभ असलेले प.पू गुरुमाऊली हे सुमारे 74 वर्षापासून अविरत चालू आहे. सदरील कामकाज हे अत्यंत पारदर्शकपणे चालले असून सदरील न्यास हा कायदेशीर रित्या त्रंबकेश्वर येथे कार्यरत असून त्यांचे कामकाज हे कायदेशीर रित्या पारदर्शकपणे लोकाभिमुख पुणे चालविले जाते. सदरील संस्थेचे सामाजिक आध्यात्मिक धार्मिक स्तरावर लोकहिताची कामे केली जातात. तसेच प.पु गुरु माऊली हे भारतभर नव्हे तर जगभर लोक प्रबोधनासाठी मेळावे घेत असतात. सदरील श्री.स्वामी समर्थ मार्गासाठी लाखो सेवेकरी जोडलेले असून सदरील सेवा मार्गास प.पू गुरुमाऊली यांनी व्यापक स्वरूप देऊन देशात व विदेशात शेकडो सेवा केंद्र उभारलेली आहे व सेवा केंद्रामध्ये बालसंस्कार, युवा प्रबोधन, रोजगार, विना हुंडा, सामूहिक विवाह, प्रश्नोत्तर सेवा, व्यसनमुक्ती, शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव, शेतकरी सत्संग मिळावे, दुष्काळात गुरांना चारा पाण्याच्या टाक्यांचे वाटप, गरीब व गरजू आदिवासींना कपडे धान्य वाटप आरोग्य शिबिर माध्यमातून मानव रोग मुक्त करणे प्रबोधन काळातील ग्रंथ निर्मिती गोधन संरक्षणाकरिता गोशाळा वेद-विज्ञान संशोधनाद्वारे संस्कृतीचे जतन या लोककल्याणकारी योजनेच्या कोट्यवधी भाविक सेवेकरी लाभ घेत आहे.
तसेच कोरोना काळात लाखो गरजूंना अन्नदान तसेच निशुल्क कोरणटाईम सेंटर उपलब्ध करून देण्यात आले. अमर रघुनाथ पाटील, चंद्रकांत गणपत पाठक यांनी कोणत्याही प्रकारे कायदेशीर बाबीचा विचार न करता वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थापोटी खोटेनाटे अर्ज करून श्री.स्वामी समर्थ गुरुपीठात 50 कोटीचा अपहार झाल्याबाबत व आदिवासींच्या जमिनी बाबत व बांधकामाबाबत जे बेकायदेशीर वक्तव्य केलेली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नसून सदरील व्यक्तींमुळे भक्त परिवारामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असून भक्ताच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून सदरील लोकांनी जी वक्तव्य केलेली आहे. वरील लोकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.