सिडस् डायनामिक्स डान्स ऍकॅडमीच्या समर कॅम्पची उत्साहात सांगता
नगर : कोविड महामारीमुळे मागील दोन वर्षे बंद असलेले उन्हाळी सुटीतील समर कॅम्प यंदा नव्या उत्साहात सुरु झाले आहेत. भिस्तबाग नाका परिसरात सिध्देश मेहेत्रे यांच्या डायनामिक्स डान्स ऍकॅडमीने घेतलेल्या एक महिन्याच्या समर कॅम्पची नुकतीच सांगता झाली. यानिमित्त ऍकॅडमीतील मुलामुलींनी तसेच नृत्य प्रशिक्षण घेणार्या महिलांचा रंगारंग कार्यक्रम माऊली सभागृहात पार पडला. महिलांनी रॅम्प वाक करीत उपस्थितांची वाहवा मिळवली तर मुलांनी विविध गाण्यांवर बहारदार नृत्याविष्कार सादर करीत सर्वांनी मने जिंकली.
या कार्यक्रमास युवा नेते ओंकार सातपुते, महेश धनगर, अजय करपे, शुभम चिलवर, तेजस पांढरे, गायत्री चिलवर आदी उपस्थित होते. समर कॅम्पमधील चित्रकला तसेच अन्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. सुमारे तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमात सवार्र्ंचे बहारदार सादरीकरण पहायला मिळाले. आई व मुलीचा आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉक, विविध गाण्यांवर मुलामुलींच्या ग्रुपने केलेला डान्स लक्षवेधी ठरला. जवळपास दोन वर्षानंतर व्यासपीठावर सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याने मुलांचे चेहरे खुलले होते. नृत्य मार्गदर्शक सिध्देश मेहेत्रे यांनी महिनाभर प्रत्येकाचा चांगला सराव करून घेतला. अनेकांनी चांगलेच कौशल्य प्राप्त करीत सादरीकरण केले. तीन वर्षांच्या चिमुरड्यांपासून ते विविध वयोगटातील मुलामुलींच्या या कलाविष्काराला प्रमुख पाहुण्यांनी दाद देवून अशा उपक्रमातून मुलांमधील कलागुण बहरत असल्याचे सांगितले.