जॉईज आयोजित सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धेचे शानदार समारंभात पारितोषिक वितरण

0
378

क्रिकेट हा खेळ सर्वांना समावून घेणारा व संघभावना शिकवणारा : नरेंद्र फिरोदिया
जैन ओसवाल युवक संघ आयोजित सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धेचे शानदार समारंभात पारितोषिक वितरण
नगर : क्रिकेट हा खेळ सर्वांना समावून घेणारा व संघभावना शिकवणारा आहे. स्व.राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेली सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धा खरोखर सर्वांना निखळ आनंद देणारी ठरली. पितळे यांच्यासारख्या धडाडीच्या व सर्वांना सोबत घेवून चालणार्‍या सदस्याला ही खरी श्रध्दांजली ठरली आहे. नियमित संघांबरोबर या स्पर्धेत महिला, मुलांचेही स्वतंत्र संघ होते. त्यामुळे प्रत्येकाला खेळाचा आनंद मिळाला. जॉईजचे अतिशय सुंदर व नेटके नियोजन पाहता येत्या काळात भव्य अशी बॅडमिंटन स्पर्धा घेण्याचेही नियोजन आहे. याशिवाय क्रिकेट स्पर्धाही दरवर्षी घेण्याचा प्रयत्न राहिल, असा मानस जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.
अहमदनगर जैन ओसवाल पंचायत सभेच्या जैन ओसवाल युवक संघ (जॉइज)च्यावतीने नगरमध्ये सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर क्लब मैदानावर झालेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण शानदार समारंभात झाले. यावेळी फिरोदिया बोलत होते. याप्रसंगी उपसभापती मीनाताई चोपडा, रिंकू फिरोदिया, श्रीमती राखी राहुल पितळे, सी.ए.अभय पितळे, जैन ओसवाल पंचायत सभेचे उपाध्यक्ष सी.ए.अशोक पितळे, राजेंद्र चोपडा, प्रधान मंत्री शैलेश मुनोत, मानद मंत्री संतोष गांधी, ऍड.विजय मुथा, अजित बोरा,अमोल पोखरणा, मर्चंटस्‌ बँकेचे संचालक किशोर गांधी, सी.ए.आयपी अजय मुथा, संजय बोरा, कमलेश भंडारी, अमित मुथा, संजय चोपडा, सुवेंद्र गांधी, मेहुल भंडारी, उद्योजक संतोष गुगळे, संतोष बोरा, ऍड.विकी मुथा, निलेश चोपडा, डॉ.सचिन भंडारी, राहुल गांधी, सी.ए.गौरव पितळे, संध्या पितळे, लीना गांधी आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्व सामने अतिशय चुरशीचे व उत्कंठावर्धक झाले. दोन वर्षांनी के्रझी क्रिकेटचा थरार पहायला मिळाल्याने प्रत्येक सामन्याला आबालवृध्दांनी मोठी गर्दी केली होती. फटाक्यांच्या आतीषबाजीत प्रत्येक सामन्याचा निकाल साजरा करण्यात आला. महिला, मुलींनीही अतिशय उत्साहात स्पर्धेत सहभाग नोंदवत या मोठ्या संधीबद्दल आयोजकांचे आभार मानले.
सी.ए.अशोक पितळे म्हणाले की, आमच्या परिवारातील राहुल पितळे हा जॉईज परिवाराशीही तितकाच जोडला गेलेला होता. जॉईजने त्याच्या स्मरणार्थ अतिशय चांगली स्पर्धा घेवून त्याच्याशी असलेले ऋणानुबंध जपण्याचे काम केले आहे. जॉईजच्या उपक्रमांना यापुढेही आमच्या परिवाराचे सहकार्य राहिल. क्रिकेट सर्वांना एकत्र जोडणारे, आपुलकी निर्माण करणारे आहे, याची प्रचीती या स्पर्धेतून सर्वांना पुन्हा एकदा आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- मुख्य गट (पुरुष)- प्रथम- साईदीप हिरोज, व्दितीय- वर्धमान प्लाय वारियर, तृतीय – राज रॉयल्स. उत्कृष्ट फलंदाज- प्रतीक गुगळे, उत्कृष्ट गोलंदाज- आनंद चोपडा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – सी.ए.सनीत मुथा, मॅन ऑफ दि सिरीज- गौरव गुगळे, मॅन ऑफ दि मॅच- अनमोल कटारिया.
महिला गट- प्रथम- नमोह 99, व्दितीय- सोल स्पार्टन्स, उत्कृष्ट फलंदाज- सोनल गुगळे, उत्कृष्ट गोलंदाज- मिताली लुणिया, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – दक्षा मुनोत, वूमन ऑफ दि सिरीज- समृध्दी कटारिया, वूमन ऑफ दि मॅच- रितिका फिरोदिया.
किडस गट- प्रथम- नमोह 99, व्दितीय- चंगेडिया रॉयल्स, उत्कृष्ट फलंदाज- नमन गांधी, उत्कृष्ट गोलंदाज- मंथन मुनोत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – वेद चोपडा, मॅन ऑफ दि सिरीज- विनय बोरा, मॅन ऑफ दि मॅच- आयुष मुथा.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस, ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धेसाठी पंच म्हणून सागर बनसोडे, प्रेम गांगुली, विजय जाधव, प्रवीण शिंदे यांनी तर गुणलेखक म्हणून अजय कविटकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना बोरा (कासवा) यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पवन गुंदेचा, प्रतिक बाबेल, ओजस बोरा, आकाश डागा, सुधीर गुगळे, स्वप्नील गांधी व जॉइजचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच जैन ओसवाल पंचायत सभेचे पदाधिकारी, सदस्य आदींनी योगदान दिले.