लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचा पाय आणखी खोलात, जिल्हा परिषदेची मोठी कारवाई

0
740

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोहार यांना २५ हजार रुपये घेताना ही कारवाई केली होती. किरण लोहार यांच्यासोबत एका लिपिकाला पकडण्यात आले होते. ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती २५ हजार रुपये ठरले होते. लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर लोहार यांना दुसरा धक्का बसला आहे. लोहार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव शिक्षण खात्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. दिलीप स्वामी यांनी किरण लोहार यांचा पदभार देखील काढून घेतला आहे. उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर युनिटने २५ हजार रुपयांची लाच घेताना कारवाई केली आहे.यामुळे शिक्षण खात्याला काळिमा फासला गेलाआहे.सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. किरण लोहार यांच्यावर कारवाईसाठी शिक्षण उपसंचालक यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.