Sonam Kapoor Baby Shower
अभिनेत्री सोनम कपूर सध्या विदेशात वास्तव्यास असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भारतीय चाहत्यांच्या संपर्कात आहे. ती सतत इन्स्टाग्रामवरुन आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या अपडेट्स देत असते. आपली पहिली प्रेग्नेन्सी त्यात येत असलेले विविध अनुभव ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सोबतच अभिनेत्री सतत बेबी बम्प फ्लॉन्ट करत फोटोशूट करत आहे. आता अभिनेत्रीच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल होत आहेत.
लिओ कल्याण नावाच्या कलाकारानेही या फंक्शनमधील फोटो आणि व्हिडिओही आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. जेसध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.