विधानसभा निवडणूक पूर्व नियोजित नुरा कुस्ती होती, दगाफटका झाला…. सभापती शिंदेंची खदखद…

0
26

विधानसभेच्या निवडणुकीत दगा फटका झाला. ही निवडणूक पूर्वनियोजित नुरा कुस्ती होती. नुरा कुस्ती असल्यामुळे मला लक्षात आले नाही. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर ही नुरा कुस्ती आहे, असे वारंवार सांगण्यात आले. भविष्यात या नुरा कुस्तीची काळजी घेऊन २०२९ च्या निवडणूकीकडे मी पाहतो. अल्पशा मताने पराभव झाल्यानंतर नाराजी असणे साहजिकच आहे. मात्र दोन भिन्न विरोधी पक्ष आणि दोन महाविकास आघाडी आणि महायुती ही कर्जत जामखेडमध्ये आणि बारामतीमध्ये एकत्र आली. विचारधारेला आणि वारसाला हरताळ फासणारी गोष्ट होती, अशी खेदजनक प्रतिक्रिया विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी दिली. विधानसभेचे सभापती राम शिंदे आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले.
शिंदे म्हणाले की, रोहित पवारांनी माझा सत्कार केला आहे. परंतु सत्कार करते वेळेस मी त्यांना सांगितले आहे की, तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या घरी येऊन सत्कार केला आहे. यावेळी मी निवडणुकीत जिंकलो नाही. परंतु मी सर्वोच्च पदावर गेलो आहे. आणि तुमचं मन सांगतय की, माझा सत्कार करायचा..! तुमचा सत्कार घ्यायला माझी हरकत नाही.. मात्र बारामतीतील तुमच्या घरी सत्कार केला पाहिजे. तरच संस्कृती जोपासली असे म्हणता येईल. असेही शिंदे यावेळी म्हणाले.