SBI Recruitment:स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु….

0
14

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने डेप्युटी मॅनेजर या पदासाठी भरती जाहीर केली आहे. ४ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी एसबीआयने नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना sbi.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरायचा आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अट देण्यात आली आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी उमेदवाराने एमबीए, पीजीडीएम पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी वयोमर्यादा २७ ते ४० निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ६४,८२० रुपये ते ९३,९६० रुपये प्रति महिना मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे आणि गुणवत्ता यादीवर केल्या जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी तुम्हाला वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी सामान्य, ओबीसी/EWS उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWBD प्रवर्गातील लोकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. हे शुल्क तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२४ आहे.