आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंक निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या सदावर्ते पॅनलची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर बाजी मारली आहे. सदावर्तेंच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसे यांचे पोस्टर घेऊन जल्लोष साजरा केला.
एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी 23 जून रोजी मतदान पार पडलं होतं. आज मुंबईतील कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन इथं मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या माध्यमातून सदावर्ते पॅनलमध्ये आणि शरद पवार पुरस्कृत कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये चुरस होती. पण या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व 19 संचालकपदांच्या जागा सदावर्ते पॅनलने खिशात घातल्या आहे.