मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या खात्यात बेबनाव, एस.टी. कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

0
30

एसटी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यातील पगार रखडला असून आणखी काही काळ तो लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडे असलेले परिवहन खातं आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या अर्थ खात्यामध्ये बेबनाव असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला 7 ते 10 तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारनं कोर्टात दिले होते. मात्र दर महिन्यात पगाराला उशीर होत असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे.