पदवीधर मतदारसंघ निवडणूक…नवा ट्विस्ट, नाना पटोलेंशी चर्चा झाली…

0
34

सुधीर तांबे म्हणाले की, मी पुन्हा एकदा सांगतो मी असो अथवा सत्यजीत असो आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. ठीक आहे राजकारण असतं, राजकारणात काही डावपेच चालू राहतात, आपण पाहिले की भगवान श्रीकृष्णाने सुद्धा महाभारतात इकडची काडी तिकडे केली त्यामुळे ते जोडलं नाही. त्यामुळे ते चिटकलं नाही. डावपेच हा राजकारणाचा भाग असतो. आपल्याला काही गोष्टी अचानक पणे घडल्याचं वाटतं. परंतु, त्या ठिकाणी आपण काहीही चुकीचं केलेलं नाही. आपण आणि सत्यजीत ने काहीही चुकीचं केलेलं नसल्याचे म्हणत, मतदारांच्या अपेक्षांवर आपण पूर्ण उतरणार असल्याची ग्वाही यावेळी सुधीर तांबे यांनी दिली.
सुधीर तांबे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आले असून, दुसरीकडे काँग्रेस पक्षाने केलेल्या निलंबनानंतर देखील सुधीर तांबे यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याच्या विधानामुळे, काँग्रेस पक्षाच्या निलंबनानंतर देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुधीर तांबे यांच्या संपर्कात आहेत का? हाच महत्त्वाचा प्रश्न यांच्या वक्तव्यामुळे उपस्थित झाला आहे.