2024 लाभ नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.या शक्यतेवर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतील महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले.
. सुजय विखे पाटील म्हणाले, पुढील उमेदवार कोण असेल याला मी लक्ष देत नाही. कागदावर आणि वास्तविकतेत मोठा फरक आहे. नगर जिल्ह्यातील राजकारण असेच खेळते. नगर जिल्ह्याचे ते वैशिष्ट्य आहे. तुम्ही कागदावर विविध पक्षांचे पदाधिकारी दिसतात मात्र जेव्हा निवडणूक लागते त्यावेळी तुम्हाला कळेल कोण-कोणाच्या बरोबर राहील.
नगर जिल्हा हा वैचारिक जिल्हा आहे. तो कर्तृत्त्ववान माणसाला संधी देतो. मी जेव्हा संग्राम जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविली त्यावेळी ते शहराचे आमदार होते तर मी मतदार संघात मतदारही नव्हतो. मात्र जनता माझ्या बरोबर उभी राहिली, असे त्यांनी सांगितले.






