सुजय विखे पाटलांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर म्हणाल्या…

0
1653

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी सोमवारी लोकसभेत “दत्त दत्ता, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाची साय, सायीचं दही, दहीचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप” अशी मराठी कविता वाचून दाखवली. या कवितेतील केवळ दत्त आणि गाय सोडली तर केंद्र सरकारने सर्व वस्तूंवर जीएसटी लावला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सुंदर उदाहरण दिलं, पण तीच राष्ट्रवादीची परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीने दुधापासून निघणारा कोणताच पदार्थ सोडला नाही, अशी बोचरी टीकाही सुजय विखे पाटलांनी केली आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी अवघ्या आठ शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी स्मितहास्य करत “सुजय गोड मुलगा आहे, माझ्या त्याला शुभेच्छा आहेत” असं प्रत्युत्तर दिलं आहे. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.