Monday, May 20, 2024

Summer….चांगले गोड टरबूज निवडण्यासाठी खास टिप्स….

Summer watermelon 🍉

* कलिंगडावर काळा स्पॉट असेल किंवा एखादा डाग असेल तर ते कलिंगड आतून गोड असेल याची आपण खात्री देऊ शकत नाही. हा डाग काळा, पांढरा किंवा हिरवा असू शकतो. पण तो डाग थोडा ठिसूळ असेल तर कलिंगड खराब लागण्याची शक्यता असते. 

* कलिंगड हे पूर्ण हिरव्या रंगाचे असते किंवा हिरवे आणि पिवळे पट्टे अशा दोन रंगात असते. गडद हिरव्या रंगाचे साल असलेले कलिंगड गोड असण्याची शक्यता अधिक असते. तर एकसारखे पट्टे असणारे कलिंगडही गोड असू शकते. पण याच्यापेक्षा वेगळे किंवा फिकट असलेले कलिंगड म्हणावे तितके गोड, रसाळ नसते. त्यामुळे सालावरुन तुम्ही कलिंगडाची पारख करु शकता. 

* कलिंगड रवाळ असेल तर ते चवीला चांगले लागते. पण ते खूप स्मूद असेल तर किंवा फारच कापसासारखे लागत असेल तर ते चवीला चांगले लागत नाहीच. पण ते कलिंगड आरोग्यासाठीही फारसे चांगले नसते. चांगले कलिंगड हे बियांशी एकसंध असते तर खराब कलिंगडाच्या आतील भाग हा बियांपासून वेगळा होणारा असतो. त्यामुळे चांगल्या कलिंगडाची पारख करताना ती अनेक प्रकारे करता येते. 

*कलिंगड आतून गोड आणि रसाळ असेल तर त्याचा गोड वास येतो, तसेच ते ताजे असल्याचे समजते. पण कलिंगड खूप जुने असेल किंवा आतून खराब असेल तर त्याचा कडवट, आंबट वास येतो. अशावेळी ते कलिंगड चांगले नाही हे आपण ओळखायला हवे. असे कलिंगड कापले तरी ते आतून कच्चे किंवा खराब असू शकते. 

* कलिंगड तुम्ही कापून घेऊ शकता. एक लहानसा तुकडा कापून घेतला तर तुम्हाला संपूर्ण फळ कसे आहे याचा अंदाज येतो. आतल्या बाजुने कलिंगड लाल बुंद असेल तरच ते गोड असण्याची शक्यता असते. आतून कलिंगड गुलाबी, पांढरे किंवा काळे असेल तर ते गोड नसते. त्यामुळे आतल्या रंगावरुनही तुम्ही कलिंगड चांगले आहे की नाही हे ओळखू शकता. 

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles